परिवर्तन...🎆


सौहार्दाच्या क्षणिक जिव्हाळ्याने किती कालखंड उधळले
आंधळ्या पुत्रप्रेमाने राष्ट्र हिरावले
भूपतीला बेड्या घातल्याने नैराश्य आले
खरंतर आपणच राष्ट्राला हतबल बनवले

हीच परंपरा जोपासल्या जाते
स्वधर्माचे मंत्र फुंकले जातात
नको त्या विचारांचा सूड घेतला जातो
सूक्ष्म क्षणांतिल गोडवा हिरव्या जातो

वेळ पुन्हा बदलतेय
शैक्षणिक मंदिरांच वास्तव बदलतंय
विकासाची वाढ खुंटतेय
संस्कृतीची कोंडी होतये

वैचारिकांनो विचारा तुमच्या मनाला
हाच का तो जिव्हाळा
हीच का ती राष्ट्रभक्ती
आणि हाच का तुमचा मानवधर्म

म्हणून म्हणतोय....
जंगलेले विचार टाळा
'स्व'त्व टाळा
अनावश्यक परिवर्तन टाळा
मानवधर्म जोपासा

#_TS ✍️

Comments

Popular posts from this blog

Reservation & the 50% Cap

Kartavya beyond Path