डावखुर्यांच साम्राज्य.....!💪



          शीर्षकावरून तुमच्या मनात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची मला चांगलीच  जाणीव आहे. या शीर्षकावरून वाचकांची थोडीशी थट्टा मी करू पाहत आहे. शीर्षक वाचल्या वाचल्या राजकीय वातावरणाची हवा आपल्या मनातून वाहू लागली असेल आणि त्या हवेने अंगात थंडी भरणं सुरु झालं असेलही; तसा विचार येन अथवा करणं सुद्धा काही अयोग्य नाही कारण सध्या भारतीय राजकारणात डावखुर्यांचा साम्राज्य नव्या संधीची वाट शोधत आहे. असो राजकार्णींयांचा तिढा त्यांनीच सोडवलेला योग्य दिसेल. अर्थातच माझ्या या शीर्षकामागे सुद्धा डावखुरे विचार नसले तरी डावखुरे मात्र नक्किच आहेत. गमतीची बाब अशी कि जरी भारतीय समाजाने लहानपणीच डावखुर्यांना उजव्यांमध्ये सुधारित करण्याचा प्रयत्न केला तरी डावखुरे आपलपण कधीच विसरू शकत नाहीत आणि मग केलेलं परिवर्तन सुधारीत होत की न्हवतं हा गर्विष्ठ प्रश्न मनामध्ये तग धरायला सुरवात करतो. या प्रश्चनाच गूढ भारतीय समजाला सोडवायला अथवा समजायला वेळ लागला तरी खेळाणे आणि कलेने डावखुर्यांचा वर्चस्व वेळोवेळी सिद्ध केलंच. साहजिकपणे आतापर्यंत तुम्हाला मला काय बोलायचे आहे याचा अंदाज आला असेलच.
                                कला क्षेत्रात माझा तितकासा रस नसला तरी क्रीडा क्षेत्रात नक्कीच आहे आणि म्हणूनच मला बोलायचय डावखुऱ्या खेळाडूंबद्दल, त्यांच्या वाढलेल्या सहभागाबद्दल आणि थोडक्यातच त्यांच्या खेळातील वर्चस्वाबद्दल. डावखुर्यांचं संघातील संख्याबळ जरी कमी असलं तरी त्यांची कामगिरी नेहमी उजव्यांच्या बरोबरीचीच ठरली. मी तर म्हणेन किंबहुना वर्चस्वाचीच..!! मग तो कोणताही खेळ असो. फुटबॉल चा विचार केला तर फेरेंक पुस्कास, रॉबेर्तो कार्लोस, दिएगो मॅराडोना, आणि जगप्रसिद्ध लिओनेल मेस्सी. जागतिक क्रिकेट वरचा पडदा बाजूला सरकावयाच म्हटल्यास ब्रायन लारा, सौरव गांगुली, वासिम अक्रम, झहीर खान, क्लीव्ह लॉईड आणि २०११ च्या विश्वचषकातील player of the tournament युवराज सिंग. यांच साम्राज्य या दोन खेळांपुरतच मर्यादित न राहता त्यांनी जगातील सर्वच खेळांमध्ये आपला वर्चस्व सिद्ध केलं. याच डावखुऱ्या यादीमध्ये आणखी काही नवे जोडायची झाल्यास लॉन-टेनिसपटू राफेल नदाल, चिनी बॅडमिंटनपटू लिन दान, बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स या खेळाडूंनी  केलेल्या चमत्कारांना विसरता येणार नाही. यांच संख्याबळ गेली कित्येक वर्ष अंतिम संघाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिलेलं आपण पाहिलं परंतु हे चित्र आता  पालटातांना दिसतंय. याचच उदाहरण सांगायचं झाल्यास नुकताच झालेला भारत विरुद्ध बांगलादेश T -२० सामना. या सामन्यात भारतीय संघात तब्बल ११ पैकी ६ डावखुरे आपल्यला पाहावयास मिळाले. नक्कीच डावखुर्यांसाठी हि अभिमानाची बाब असली तरी उजव्यांसाठी विचार करायला भाग पाडणारी. या सगळ्यांचं पालथं चित्र डोळ्यासमोर उभं असलं तरी भारतीय कौटुंबिक पद्धत त्यांच्या मुलाने/मुलीने डाव्या हातांनी जेवलेलं कधीच स्वीकार करणार नाहीत. आणि किंबहुना डावखुर्यांना नको असलेल्या सुधाराचे प्रयत्न सतत चालूच ठेवेल यात हि काही शंका नाही.
             हे साम्राज्य जपणं डावखुर्यांचच काम आहे आणि ते नक्की करतीलच एवढाच आशावाद.



                                                                                                                                      #_TS ✍




Comments

Post a Comment

Do Share..!
Do Subscribe..!

Popular posts from this blog

Reservation & the 50% Cap

Kartavya beyond Path